पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांचा रंगाविष्कार! ‘आरंभ सखी मंच’चा दिमाखात शुभारंभ
चिंचवड : आरंभ सोशल फाउंडेशन संचालिका सोनाली तुषार हिंगे आयोजित रंगवर्षा… उत्सव रंगाचा, जल्लोष महिलांचा!’ हा कार्यक्रम पिंपरी रोटरी क्लब मैदान, संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो युवती आणि महिलांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून रंगांच्या उत्सवाचा आणि मनोरंजनाचा आनंद लुटला.
यावेळी आमदार उमा खापरे, शहराच्या उपमहापौर शर्मिला बाबर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रिया अण्णा बनसोडे, महिला व बालकल्याण समिती सदस्य. नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेविका श्रीमती. अनुराधा गोरखे, सारिका विशाल मासुळकर, रेखा देवराम देवकर,मनपा पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. शीतल प्रशांत शितोळे, अनूश्री हर्षल ढोरे,अध्यक्ष – बालाजी महिला प्रतिष्ठान, अपर्णा राजू मिसाळ, भाजपच्या ऐश्वर्या अमित बाबर,भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव कविता हिंगे, कविता खराडे, वरिष्ट महिला कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष , अर्चना वेदपाठक, प्राचार्य ASM कॉलेज, संजीवनी पांडे, IT CELL प्रमुख महाराष्ट्र राज्य, अनीता वाळूंजकर, मंडल अध्यक्ष भाजपा. सिम्मी श्रीवास्तव, मंडल सचिव भाजपा, राधिका बोर्लीकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा सामाजिक कार्यकर्त्या फहमिदा जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आरंभ सखी मंच’ व्यासपीठाचे लोकार्पण
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी समर्पित ‘आरंभ सखी मंच’ या विशेष व्यासपीठाचा शुभारंभ. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंचाच्या बोधचिन्हाचे (Logo) अनावरण करण्यात आले. या मंचाच्या माध्यमातून भविष्यात महिलांचे आरोग्य, उद्योजकता विकास, सुरक्षा आणि लघु उद्योग प्रशिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे फाउंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांनी स्पष्ट केले.
रंगोत्सवाबरोबरच महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमधील विजेत्यांना ‘वस्त्रकला’ यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका ओंकारेश्वरी यांनी आपल्या खास शैलीत केले. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.