माजी खासदार प्रदीप रावत यांच्या मातोश्रींचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

8

पुणे : पुणे लोकसभेचे माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. या दुःखद बातमीची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रावत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

मंत्री पाटील यांनी दिवंगत मातोश्रींच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी रावत परिवाराशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. प्रदीपदादा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या या कठीण काळात आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो आणि रावत परिवाराला या मोठ्या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.