पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक विक्रम; सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे भारतीय नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

8

पुणे : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असा एकूण ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून, भारतातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते होण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत गौरवोद्गार काढले आहेत.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले की, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ केलेली जनसेवा असो किंवा भारताचे पंतप्रधान म्हणून देशाला ‘विश्वगुरू’ बनवण्यासाठी घेतलेले अहोरात्र कष्ट असो; मोदीजींच्या नेतृत्वाखालील या प्रवासाने प्रत्येक भारतीयाचे जीवन समृद्ध केले आहे. ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून त्यांनी प्रदीर्घ काळ सत्तेत राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा केवळ सत्तेचा विक्रम नसून, ‘अंत्योदय’ आणि ‘विकसित भारत’ हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी समर्पित असलेल्या प्रवासाचा गौरव आहे.

मोदीजींच्या रूपाने देशाला एक उत्तुंग नेतृत्व लाभले आहे, हे आमचे भाग्य आहे, अशा भावना व्यक्त करत पाटील यांनी त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना देखील केली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सोशल मीडियावरूनही पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.