मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी व नगरसेवकांचा सस्नेह मेळावा; हिंदू नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा

6

पुणे : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी कोथरूड मंडलाचा सस्नेह मेळावा उत्साहात पार पडला. पुण्यातील ‘निसर्ग छाया’ येथे आयोजित या कार्यक्रमात भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मंत्री पाटील यांनी उपस्थित सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, आगामी काळात जनसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. वस्ती पातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांच्या सहभागामुळे कोथरूड भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुका आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. आगामी कार्यात आपण सर्व एकजुटीने काम करू आणि संघटन अधिक मजबूत करू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.