सांगलीचे मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट; कार्यकाळातील योगदानाबद्दल गौरव

8

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार मानून, पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रशासकीय सेवेतील त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता आगामी काळातही जनसेवेसाठी मोलाची ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

सत्यम गांधी यांच्या कार्यकाळात सांगली महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्वतःचे इंधन पंप (Petrol/Diesel Pump) उभारण्याचा अभिनव प्रस्ताव मांडला. त्यांनी नुकतेच सांगली महापालिकेचे १,०६५ कोटी रुपयांचे पर्यावरणपूरक आणि पायाभूत सुविधांवर भर देणारे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते. ‘माझी वसुंधरा’ अभियान, शहर स्वच्छता आणि ‘सांगली मॅरेथॉन’ सारख्या उपक्रमांना त्यांनी प्रशासकीय पाठबळ दिले होते.

याप्रसंगी महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजपा नेते पांडुरंग कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.