डॉ. किरण ठाकूर हे पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रातील खरे ‘संघर्ष योद्धा’; सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिष्टचिंतन
सांगली : दैनिक ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथे आयोजित सस्नेह मेळाव्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी पाटील म्हणाले, किरण ठाकूर हे खऱ्या अर्थाने एक ‘संघर्ष योद्धा’ आहेत. त्यांनी पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्यातील ही ऊर्जेची मशाल अशीच तेवत राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशा शुभेच्छाही पाटील यांनी यावेळी दिल्या. या सस्नेह मेळाव्यास सांगलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि लोकमान्य सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम, गटनेते संदीप आवटी, बालकल्याण विभागाचे सभापती फिरोज मुसा जमादार, सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हा अध्यक्ष संग्राम महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजपा माजी अध्यक्ष दीपकबाबा शिंदे-म्हैसाळकर, पत्रकार शिवराज काटकर, मंगेश मंत्री आणि तरुण भारत परिवाराचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.