बीड जिल्ह्यातील जवानाला गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात वीरमरण

बीड जिल्ह्यावर शोककळा

11

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले त्यामध्ये बीडमधील पाटोदा तालुक्यातील आरिफ तौसिफ  शेख हे देखील या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितून ते पोलीस दलात रुजू झालेले शहीद जवान आरिफ तौशिब शेख हे पाटोदा येथील रहिवासी आहेत.  तौसिफ शेख यांचे वडील आरिफ शेख हे हॉटेल कामगार आहेत, तर आई शेतमजूर आहे. तौसिफ यांना एक भाऊ  असून ते  औरंगाबाद येथे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. तौसिफ यांच्या जाण्याने कुटुंबासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.