जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही – पंकजा मुंडे

1 435

गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाटोदा येथील शेख तौसिफ शेख आरेफ हा जवान शहीद झाला होता. आज जिल्हयात दुष्काळी दौ-यावर असताना बीडच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी पाटोदा येथे जाऊन शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

राज्य सरकार तौसिफ कुटुंबियांच्या पाठिशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानही सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास त्यांनी  दिला. मुंडे म्हणाल्या “शेख तौसिफ जिल्हयाचे भूमीपुत्र आहेत, त्यांनी नक्षलवाद्यांशी लढताना आपले प्राण दिले, त्यांच्या आई वडिलांना मी भेटले, सरकार त्यांच्या कुटूंबियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हा जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही.”

Get real time updates directly on you device, subscribe now.