संस्कृती परदेशी डिझायनर, किरण तांबे फेस ऑफ द इयर २०१९

1526

झेन एशिया फाउंडेशनचा फेस अँड डिझायनर ऑफ द इयर  २०१९ पॉवर्ड बाय सीम बाय सीमा आणि ए आय एफ टी फॅशन डिझाइनिंग इन्स्टिटयूट हा सोहळा नुकताच मुंबई मध्ये पार पाडला. या कार्यक्रमाचे आयोजन झेन एशिया फाउंडेशनचे संस्थापक डॉ चतुरसिंग खालसा यांच्या वतीने करण्यात आले होते.  मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरातील युवा फॅशन  डिझायनर व मॉडेल्स ने सहभाग घेतला. 


  डिझायनर ऑफ द इयर हा किताब एन आय एफ डी फॅशन डिझाइनच्या संस्कृती परदेशी हिने पटकावला तर  सायरा मेमन आणि सुषमा बोराडे हिला उतेजनार्थ पारितोषिक मिळाले, त्यासोबतच फेस ऑफ द इयर किताब किरण तांबे हिला मिळाला आणि लक्ष्मी दुबे व अनुष्का खडतकर यांना उतेजनार्थ  पारितोषिक मिळाले. 

या स्पेर्धेला परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध इंटरनॅशनल फॅशन डिझायनर सी . सिंग,
 फॅशन फोटोग्राफर योगेन शहा, फॅशन डिझाइनर गीता थोरात, इंटरनॅशनल ग्रुमर सीमॉन डेव्हिड्सन, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का खोसला, RIFD चे संस्थापक, सी इ ओ डॉ. राज शर्मा आदी तसेच   फॅशन, डिझाइन, मॉडेलिंग क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सहभागी होत्या. ” फॅशन व मॉडलिंग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी हा उपक्रम आयोजित केला जात असून यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचे झेन एशिया फाउंडेशनचे संस्थापक  डॉ चतुरसिंग खालसा यांनी सांगितले. मीडिया, मनोरंजन तसेच फॅशन, टेक्सटाईल क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते.