२६ सप्टेंबरला रंगणार ‘डिझायनर आणि फेस ऑफ द इयर २०१९’

14

मुंबई :  झेन एशिया फाऊंडेशन द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या डिझायनर आणि फेस ऑफ द इयर २०१९ Powered by SEAM BY SEEMA & AIFT FASHION DESIGNING INSTITUTE साठीच्या ऑडिशनचा पहिला टप्पा नुकताच मुंबई येथे पार पडला.  मुंबई तसेच उपनगरातील अनेक तरुणींचा मोठा सहभाग या वेळी पहिला मिळाला.  यावेळी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर योगेन शहा, गीता थोरात यांच्या समवेत खास दिल्लीहून आलेले सेलेब्रिटी कोच एस ए आनंद यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले. 


झेन एशिया फाऊंडेशनचे संस्थापक चतुरसिंग खालसा १९९७ पासून या उपक्रमाचे आयोजन करीत असून फॅशन इंडस्ट्रीमध्ये करिअर करू पाहणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या उपक्रमाच्या माध्यमातून उभा करण्यात त्यांना यश आले आहे. फर्स्ट महाराष्ट्र डॉट कॉम माध्यम प्रायोजक असलेला यंदाचा सोहळा २६ सप्टेंबर २०१९ ला सायंकाळी ६ वाजता बांद्रा पश्चिम येथील सेंट.अँड्रीव्ह ऑडिटोरियम मध्ये होणार असून आयोजक, स्पर्धक यांची जोरदार तयारी यासाठी  सुरु आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!