सनी निम्हण यांचा भाजपा मध्ये प्रवेश 

12

पुण्यातील शिवाजीनगरचे शिवसेनेचे मा.आमदार विनायक निम्हण यांचे पुत्र, माजी नगरसेवक, सनी निम्हण यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला. 

मुंबई मध्ये भारतीय जनता पार्टीचे संकल्प पत्र प्रकाशन सोहळ्यात हा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्या समवेत प्रमुख वरिष्ठ पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 


 मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तसे पुढे येऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिकांची मोर्चे बांधणी करण्यासाठी अनेक दिग्गज पक्षांतर करत आहेत. निम्हण यांचा प्रवेश देखील त्याच धर्तीवर झाल्याचे बोलले जात आहे, पण या प्रवेशामुळे भाजपाची शिवाजीनगर मधील ताकद आणखी वाढली आहे हे नक्कीच.