पुणे महानगरपालिकेची ‘कोरोना हद्दपार’ ची शपथ, १० दिवस चालणार मोहीम

14

“पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ मोहिमेचा प्रारंभ..!आपल्या पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून “पुण्याचा निर्धार_कोरोना हद्दपार” ची मोहिम पुढील दहा दिवस म्हणजे १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिकेच्या आवारात “पुण्याचा निर्धार _ कोरोना हद्दपार” या मोहिमेचा शुभारंभ व शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना कोरोना हद्दपार ची शपथ ही देण्यात आली.

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहळ, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, विरोधी पक्षनेत्या सौ. दिपालीताई धुमाळ, नगरसेविका सौ माधुरीताई सहस्रबुद्धे, नगरसेवक श्री. सुभाष जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त ई. कुणाल खेमनार, महाराष्ट्र शासन मुख्य समन्वयक डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती, बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था, सामाजिक कृतिशील समूहाचे सदस्य, तसेच पालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.