फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा, उदयकुमार आहेर यांची  पणन संचालकांकडे मागणी 

26

राज्याचे पणन संचालक श्री. सतिश सोनी यांची उदयकुमार आहेर यांनी समक्ष भेट घेऊन देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध घोटाळ्याचा वाचला पाढा

पुणे- नाशिक जिल्ह्यातील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध घोटाळ्यां संदर्भात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर पणन संचालकांकडे केली.


आज पुणे येथे मध्यवर्ती इमारतीत राज्याचे पणन संचालक श्री. सतिश सोनी यांची उदयकुमार आहेर यांनी समक्ष भेट घेऊन देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध घोटाळ्याचा पाढा वाचला, त्यात बेकायदेशीर गाळा विक्री, विनाटेंडर संरक्षक भिंतीचे बांधकाम, कॅलेंडर छपाई, शेतकऱ्यांचे कांद्याचे बुडविलेले ६० लाख, जमिन अकृषिक नसतांना केलेले बेकायदेशीर बांधकाम आदी विषयांवर निवेदन दिले व शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली.


यावर पणन संचालक सतिश सोनी यांनी सर्व बाबी काळजीपूर्वक समजावून घेवून होत असलेल्या प्रकारांबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले आणि अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई  करण्याचे आश्वासन दिले.