विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, २ पोलीस गंभीर जखमी

156

सांगली : महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील एका गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

विश्वजीत कदम सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप इथे पाहणीसाठी जात होते.  हा अपघात इतका भयानक होता कि कार रस्त्याच्या बाजूला थेट उलटी झाली. विश्वजीत कदम सुखरूप असल्याची माहिती आहे.

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेल्या गाडीच्या समोर अचानक  एका व्यक्तीने धाव घेतली. त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी ताफ्यातील एका गाडीने तातडीने वाट बदलली. पण यात गाडीचा ताबा सुटला आणि गाडी उलटी झाली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी पोलिसांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.