राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीतूनच हे समाजसेवेचं व्रत – रविंद्र साळेगावकर

10

 पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्र साळेगावकर यांनी मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी नागरिकांसाठी ऑनलाइन तक्रार नोंदणी व निवारण मोहीम सुरु केली आहे. एक क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना आपल्या तक्रारी या ऑनलाइनप्रणालीच्या माध्यमातून नोंदविता येणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, महिला शहराध्यक्षा अपर्णा पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, नगरसेविका निलीमा खाडे, जोत्स्ना एकबोटे, नगरसेवक राजेश येनपुरे, दीपक पोटे, माजी नगरसेवक दत्ता खाडे यांच्या उपस्थितीत या ऑनलाईन तक्रार निवारण मोहिमेच्या प्रणालीचे लोकार्पण रविंद्र साळेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी करण्यात आले.

यावेळी साळेगावकर यांचा कार्य अहवाल हि मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.  यावेळी शिवाजीनगरचे गणेश बागडे, प्रतुल जागडे, आनंद छाजेड, धर्मेश शहा, सुजित गोटेकर यांच्या समवेत शहरातील भाजपचे पदाधिकारी गणेश घोष, जेष्ठ,युवा व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

संघाच्या शिकवणीतूनच हे समाजसेवेचं व्रत

रविंद्र साळेगावकर यांना या संकल्पने विषयो विचारले असता ते म्हणाले कि पूर्वी प्रत्येक सोसायटी मध्ये अशा तक्रार पेट्या भाजपच्या मार्फत बसविण्यात आल्या होत्या आणि त्या तक्रार पेटीमध्ये जमा झालेल्या तक्रारींचे अर्ज जमा करण्याचे काम ते करीत असत आणि पुढील कारवाईसाठी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवत असत, त्यातूनच अशा प्रकारची काही यंत्रणा डिजिटल स्वरूपात असावी अशी संकल्पना मनात आली आणि आज डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते शक्य झालं याचा आनंद हि होत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीतूनच हे समाजसेवेचं व्रत हाती घेतल्याचे हि ते म्हणाले.

ऍक्टिव्हिजम हा साळेगावकरांचा फार मोठा गुण 

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले कि ऍक्टिव्हिजम हा साळेगावकरांचा फार मोठा गुण आहे, आणि तो त्यांनी योग्य दिशेने वापरला आहे. जिथे जिथे अन्याय असतो तेंव्हा तो राग शब्दरूपात नेहमी बाहेर पडला आहे त्याचा उपयोग शिवाजीनगर परिसरात भारतीय जनता पार्टी बद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी झाला आहे असे सांगत साळेगावकरांना शुभेच्छा दिल्या.

कार्यालये हि चळवळीची केंद्रे झाली पाहिजेत 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले कि कार्यालये हि चळवळीची केंद्र झाली पाहिजेत. कार्यालयातून जनतेचे प्रश्न – समस्यांच्या सोडवणुकीसाठी निवेदन देणे सातत्याने व उत्स्फूर्तपणे होणे गरजेचे आहे, भारतीय जनता पार्टी हि जिवंत माणसांची  पार्टी आहे पार्टीतुन सारखा संघर्ष, चळवळ झाली पाहिजे असे म्हणत रविंद्र साळेगावकर यांचे कार्यालय चळवळीचे केंद्र बनावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.