मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आदित्य प्रतिष्ठान आयोजित विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची कीर्तन सेवा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित ‘अभंगवारी’ हा भक्तिसंगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

261

पुणे : आषाढी एकादशीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. यासोबतच पाटील यांनी रविवारी पुण्यात आयोजित ‘अभंगवारी’ या भक्तिसंगीत कार्यक्रमास देखील हजेरी लावली.

आदित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होत चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. या कीर्तनातून अभ्यंकर गुरुजींच्या प्रबोधनात्मक व विचारस्पर्शी वाणीचा पाटील यांनी लाभ घेतला.

यासोबतच पुण्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंगवारी’ या भक्तिसंगीत कार्यक्रमास पाटील यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुमधुर आवाजातील अभंगांनी वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले. या दिव्य संगीतमय कार्यक्रमात विठ्ठल नामस्मरणात तल्लीन होत भक्तीचा अद्भुत अनुभव घेतला, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.