आयपीएल मध्ये कोरोनाचा शिरकाव, सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू कोरोनाबाधित

मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे तीन सामने होताच एक मोठं संकट पुन्हा आय़पीएलसमोर उभ येऊन ठाकलं आहे. कोरोना महामारीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा  खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाली आहे  महत्त्वाचं म्हणजे आजच हैद्राबाद संघाचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. पण त्यापूर्वीच ही बातमी समोर आली आहे.

टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं असून आज होणाऱ्या सामन्यावर मात्र कोणतं संकट नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या टी. नटराजनची सर्वात आधी RT-PCR टेस्ट करण्यात आली होती. सामन्याआधी सर्वच खेळाडूंची ही चाचणी होतेय त्यात तो कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर त्याच्या निकट संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये विजय शंकर (खेळाडू), विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर (फीजिओ), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), पीए. गणेशन (नेट बोलर) यांचा समावेश आहे. दरम्यान संघाच्या इतर सदस्यांची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आली आहे.