मोठी बातमी: हार्दिक पांड्याची 5 कोटी किमतींची 2 घड्याळे कस्टमच्या ताब्यात

मुंबई: कोरोनामुळं टी-20 विश्वचषक 2021 युएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याही संघासह काल रात्री उशिरा मायदेशात परतला. मात्र, विमानतळावर पोहचल्यानंतर कस्टमनं हार्दिक पांड्याची 5 कोटी किंमतीची 2 घड्याळं ताब्यात घेतली आहे. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे इनवॉइस नव्हते. तसंच त्यानं या घड्याळांची कोणताही माहिती दिली नसल्याचं सागण्यात आलंय.

युएईतून मुंबईत येताच हार्दिक पंड्या दोन घड्याळांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आगमन झाल्यानंतर कस्टम विभागाकडून हार्दिक पंड्याच्या सामनाची तपासणी करण्यात आली. यावेळी हार्दिक पंड्याजवळ पाच कोटी रुपये किमतीची दोन महागडी घड्याळं सापडली.

दोन्ही घड्याळांबाबत कस्टम विभागाकडून हार्दिक पंड्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, हार्दिक पंड्याकडून समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना मिळालं नाही. त्याचबरोबर हार्दिक पंड्याकडे या दोन्ही घड्याळांचं बिलही नव्हतं. त्यानंतर कस्टम विभागाने दोन्ही घड्याळं जप्त केली. या प्रकरणाची विभागीय चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

हार्दिक पंड्याच्या आधी त्याचा भाऊ क्रुणाल पंड्याकडेही अशीच महागडी घड्याळं सापडली होती. नोव्हेंबर २०२०मध्ये क्रुणाल पंड्याजवळ महागडी घड्याळं मिळाली होती. त्यावेळी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी रोखलं होतं. नंतर हे प्रकरण कस्टम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!