पेट्रोल, डिझेलने सगळे विक्रम काढले मोडीत, तुमच्या शहरातील किंमत किती?

मुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज (शुक्रवार) म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या  दरात पुन्हा वाढ झाली आहे. IOCL दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशंनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी ही दरवाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.89 रुपये आणि डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढून 90.17 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 107.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97.84 रुपये प्रति लिटर झाली आहे.

काही राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 107.95, दिल्ली – 101.89, कोलकाता – 102.47, चेन्नई – 99.58

काही राज्यातील डिझेलचे दर

मुंबई – 97.52, दिल्ली – 90.17, कोलकाता – 93.27, चेन्नई – 94.74

24 सप्टेंबरपासून डिझेलचे दर सहा वेळा वाढले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. पण असं असताना देखील तेल कंपन्यांकडून दर कमी करण्याचे कोणतंही प्रयत्न केले जात नाही. तर त्याउलट दिवसेंदिवस दर वाढवलेच जात आहेत. 24 सप्टेंबरनंतर पेट्रोलच्या किंमतीत सहा वेळा दरवाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत सहा वेळा दरवाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीत 20 पैशांनी, 26 सप्टेंबरला 25 पैसे प्रति लिटर, त्यानंतर 28 सप्टेंबरला देखील डिझेलच्या किंमतीत वाढ केली होती. तर 30 सप्टेंबरला देखील पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!