पिंपरीतील मुख्य बाझार बी-ब्लॉकमधील ४४ तासापासून विजपुरवठा खंडीत

पिंपरी: पिंपरी येथील सोमवार (दि.५) पासून मुख्य बाजारपेठेतील बी-ब्लॉक 10 आणि 11 मधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ४४ तास उलटूनही अद्याप विजपुवरठा सुरळीत करण्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांची आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास काही तांत्रिक करणामुळे पिंपरी मुख्य बाझारपेठ, बी-ब्लॉक 10 आणि 11 मधील वीजपुरवठा खंडीत झाला. महावितरण कर्मचा-यांनी दोन तासांत वीज पुरवठा सुरळीत असे सांगितले मात्र, 44 तास उलटल्यानंतर देखील वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवासी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.
स्थानिक रहिवासी मुकेश सेरवानी म्हणाले, ‘गेल्या तासाहूंन अधिक काळ आम्ही अंधारात आहे. महावितरण अधिकारी दोन तासांत वीजपुरवठा सुरू करतो म्हणून सांगितले पण, अद्याप वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. घरात लहान मुले आहेत, मोबाईल चार्चिंग नाही, वर्क फ्रॉम होमची अडचण झाली आहे.’
पिंपरी महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाबर म्हणाले, ‘याभागात विद्युत वाहीनीत अनेक अडथळे आहेत, दुरुस्ती करत असताना वीजेचा झटका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. महावितरण कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून, दोन तासांत वीजपुरवठा सुरळीत होईल.’