पुण्यातील कबड्डीपटू मुलीची हत्या झालेल्या कुटुंबियांना चंद्रकांत पाटलांकडून आर्थिक मदत
पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आली होती. तिच्यावर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली केली होती. मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या.
मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यांच दरम्यान तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान आज या घटनेतील मयत मुलीच्या कुटुबियांची भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी मुलीच्या दिव्यांग भावाला आपले दुःख व्यक्त करताना अतिशय वेदना होत होत्या. तरीही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा व्हावी, अशी आर्ततेने मागणी करत होता. यावेळी पाटील यांनी कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
Read Also :
-
नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, पुढची कथा मी सांगणार – संजय राऊत
-
हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा मृत्यू; 10 जणांना रेस्क्यू…
-
पती समीर वानखेडेवर टीका करणाऱ्याला क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…
-
आपल्या हिंदू मानबिंदुंची पुन:स्थापना म्हणजे राम मंदिर उभारणी – चंद्रकांत पाटील