पती समीर वानखेडेवर टीका करणाऱ्याला क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. आत्तापर्यंत चारवेळा त्याला जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला मात्र तो फेटाळण्यात आला आहे. ही कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकार मधून चारही बाजूने टीका होत आहे. समीर वानखेडेंची बायको आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या पतीविरोधात होत असलेल्या टीकेवर उत्तर दिलं आहे. क्रांतीने ट्वीट करत समीर वानखेंडेंना आपला भक्कम पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.

क्रांतीने ट्वीट करत म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही लाटांविरोधात पोहता, तेव्हा बुडण्याची शक्यता जास्त असते. पण जेव्हा देव तुमच्या सोबत असतो तेव्हा या जगातली कुठलीही लाट मग ती किती ही प्रचंड असो तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण तो तुमच्या मागे उभा आहे. तो सत्यासोबत आहे. क्रांतीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की देव सोबत असल्यावर कुठलीही लाट तुम्हांला बुडवू शकत नाही. समीर वानखेडे आपलं काम करत आहेत. आणि देव त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यामागे भक्कमपणे उभा आहे.

याच्याआधी काही दिवसांपूर्वी क्रांतीनं समीर यांचा प्रचंड अभिमान वाटतो, असं सांगितलं होतं. ते प्रथम देशाचे आहेत मग आमचे,असंही क्रांती म्हणाली होती. इतकंच नव्हे तर त्यांची काळजी वाटते पण त्यांना पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थीतीत त्यांना सहकार्य करण्याची तयारी असल्याचंही क्रांती रेडकर म्हणाली होती.

Read Also :