अभिनेता झालो आणि सायन्समध्ये संशोधन करायचं राहून गेलं – दिलीप प्रभावळकर

नाशिक: आवडीतून अभिनयाचा छंद जडला आणि त्यातून अभिनेता बनलो. खरंतर मी विज्ञान विषयात संशोधन करणार होतो. मात्र, आयुष्यात दिशा बदलणारी माणसं भेटत गेली. रंगायन संस्थेच्या नाटकांचा प्रेक्षक होतो. पुढे त्यामुळे लोभ नसावा नाटकात सहभागी झालो. ते आयुष्यातील पहिले नाटक होते. त्यानंतर अनेक संधी मिळात गेल्या, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी जीवनप्रवास उलडला. त्यांची मुलाखत शिवानी जोशी यांनी घेतली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या पुरस्कारांचे सोमवारी (दि.२५) महाकवी कालिदास कलामंदिरात वितरण करण्यात आले. यावेळी वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार लेखक शफाअत खान, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार दिलीप प्रभावळकर आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे रवींद्र ढवळे यांना प्रदान करण्यात आला.

कोरोनामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचाही सन्मान विशेष योगदान पुरस्काराने करण्यात आला.

यावेळी कलावंत प्राजक्त देशमुख, लावण्यवती शिरीन पाटील, शमा देशपांडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार गुरूंच्या नावाने असून, त्याचे खूप महत्व असल्याचे रवींद्र ढवळे यांनी सांगितले. नाटकाने रूप बदलले पण मेले नाही. व्हर्च्युअल जमान्यात नाटक मरणार नाही. नाटकाची मूळ ताकद सत्य असल्याचे लेखक शफाअत खान म्हणाले.

Read Also :