जळगावात धावत्या ट्रकला आग; आगीत लाखोंचा माल जळून खाक

जळगाव: धुळ्याकडून बारदान घेवून जळगावकडे निघालेल्या ट्रकचे टायर फुटल्यानंतर निघालेल्या ठिणगीमुळे चालत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली आहे.

धुळे येथून ट्रक  कृषि उत्पन्न बाजार समितीत लागणारे बारदान घेवून जळगाव शहरात रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दाखल झाला. शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाण पुलावरून जात असतांना चालत्या ट्रकचे अचानक टायर फुटले. ठिणगी उडाल्याने ट्रक मधील बारदानला आग लागली. ट्रकला आग लागल्याचे समजताच ट्रक चालकाने रस्त्यावरच ट्रक थांबविला.

यावेळी रस्त्यावर येणार्‍या-जाणार्‍या नागरीकांनी देखील आपापली वाहने थांबवून आग आटोक्यात आण्यासाठी ट्रक मधील बारदान काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही वेळातच ट्रकने देखील पेट घेतला. दरम्यान, काही वेळातच महापलिकेच्या अग्निशमन पथकाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्यात आली.

आग लागल्यानंतर शहर पोलीस वाहतूक शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूने जाणारे वाहून काही अंतरावर थांबविले. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थप्प झाली होती.

Read Also :