विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा गजाआड
मुंबई: टिम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या १० महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. हैद्राबादमधून या आरोपीला मुंबई आणले जात आहे. रामनागेश अलिबथिनी असे या आरोपीचे नाव असून तो केवळ २३ वर्षांचा आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी उच्चशिक्षित असून त्याने बी टेक केल आहे. तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याने स्विगी फूड डिलीव्हरी अँपचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम त्याने केले होते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीच्या लहानग्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली होती.
टी २० वर्ल्ड कपचा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्याचे फोन आले. ट्विटवर एका अज्ञान अकाऊंटवरुन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर ज्या अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आले ते अकाऊंट डिलीट करण्यात आले. मात्र त्यानंतर त्या ट्विटचा स्क्रिनशॉर्ट व्हायरल झाला होता. ज्यात विरुष्काची मुलगी वामिकावर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आल्याचे दिसत होते. नेटकऱ्यांनी देखील या प्रकरणाचा तीव्र संताप व्यक्त केला होता.
विराट कोहलीच्या मुलीला ट्विटर देण्यात आलेल्या धमकीची दखल दिल्ली महिला आयोगाने घेतली होती. दिल्ली महिला आयोगाकडून पोलिसांना याबाबत नोटीस जारी करण्यात आली होती ज्यात आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.