रिसोडमध्ये बिछायत गोडाऊनला भिषण आग; एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

12

रिसोड: प्रतिनिधी शंकर सदार/ वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील सराफ लाईन भागात मंगल बिछायत केंद्राला रात्री दहाच्या सुमारास भिषण लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे लागल्याचे समोर आले आहे. या सिलेंडर स्फोटमध्ये आशिष राऊत हा 16 वर्षीय मुलगा जागीच ठार तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमध्ये सामान असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या आगीत गोडाऊनमधील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.

आग लागल्यचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने अखेर अग्निशमनदलाला बोलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पोलीस देखील घटनास्थळी हजर झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.