• Likes
  • Followers
  • Followers
  • Wednesday, July 6, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करा, अन्यथा….

कृषीमहाराष्ट्र
On Dec 2, 2021
Share

मुंबई: खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासन अतिशय गंभीर असून ‘पाहू, करु’ अशी भूमिका घेऊन चालढकल करणाऱ्या आणि विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये गेल्या तीन वर्षात विविध विमा कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आढावा घेतला. या बैठकीला कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार यांचेसह आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, इफ्को टोकियो, एचडीएफसी एर्गो, बजाज अलियांझ, एआयसी ऑफ इंडिया या विमा कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पीक विम्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 84 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापोटी 2312 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. 1842 कोटी रुपये नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली असून त्यापैकी फक्त 994 कोटी रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे.

पिकांचे सर्वेक्षण झाले तरी नुकसानभरपाई निश्चित करणे बाकी असून सर्व विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये विम्याच्या संदर्भात 23 जिल्ह्यांनी अधिसूचना काढल्या असून या जिल्ह्यात 425 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. यावेळी कृषिमंत्री श्री.भुसे यांनी नाशिक आणि जळगावच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Agriculture Commissioner Dheeraj KumarAgriculture Minister Dadaji BhuseAIC of India were present.Bajaj AllianzDeposit the sum insured in the farmer's account within eight daysHDFC ErgoIFFCO Tokyootherwise.Prime Crop InsuranceRelianceSenior executives from ICICI Lombardअन्यथा….आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा कराआयसीआयसीआय लोम्बार्डइफ्को टोकियो
You might also like More from author
महाराष्ट्र

भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे…

महाराष्ट्र

आरोग्य खात्याच्या परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा….

महाराष्ट्र

सोमवारपर्यंत कामावर आल्यास निलंबन रद्द, अन्यथा…

महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज, ‘वर्षा’वर दाखल

देश- विदेश

मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे…

Jan 12, 2022

आरोग्य खात्याच्या परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा….

Dec 10, 2021

सोमवारपर्यंत कामावर आल्यास निलंबन रद्द, अन्यथा…

Dec 10, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज,…

Dec 2, 2021

मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात…

Nov 24, 2021

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर