सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश

मुंबई: देशाचे संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे. तमिळनाडूमधील उटी जिल्ह्याती कन्नुर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे काही अधिकारी असल्याचं समजतं. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेली माहिती अशी, की तमिळनाडू येथील उटीमध्ये लष्कराच्या हेलिकॉपरचा  भीषण अपघात झाला आहे. उटी येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधून लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. त्यात सीडीएस बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

हा परिसर अत्यंत घनदाट असल्याचे सांगण्यात येते. येथे सर्वत्र केवळ झाडेच-झाडे आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा दिसून येत होत्या. पोलीस, लष्कराचे जवान तसेच हवाई दलाचे जवान बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच परिसरात शोधमोहीमही राबवली जात आहे.