शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना हा राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला – उपमुख्यमंत्री अजित पवार

23

मुंबई: बंगळूरुमध्ये छत्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ तरुणांकडून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांच्या भावना आणि अस्मितेवर हल्ला करण्यात आलाय अशा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.