पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

26

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील सांगवी भागातील काटेपुरम येथे भर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सकाळीसाधारण साडेदहाच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत योगेश जगताप नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिकमाहिती समोर आली आहे. जखमी योगेश याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळावर दाखल होता तपास सुरु केला आहे.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास काटेपुरम चौक येथे योगेश जगताप उभे होते. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्तींनी योगेश्वर गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच योगेश पळू लागला , मात्र आरोपीनी केलेल्या फायरिंग मधील दोन गोळ्या त्यांना लागल्या व ते खाली कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथीलच दुचाकी स्वाराला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याच्याकडून दुचाकी हिसकावून घेतली व तिथून पळ काढला. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिला आहे.

गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या योगेश जगताप यांच्यावर गंभीर गुन्हयाची नोंद आहे. योगेशवर पिंपरी चिंचवड मधून तडीफार केल्याची कारवाईही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं रुग्णालयात दाख कारण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घाटाने मुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.