चिंचवडकरांनी अश्विनी वहिनींना विजयी करुन एकप्रकारे लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजलीच वाहिली आहे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील  

19

चिंचवड : पिंपरी चिंचवड येथे  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.  या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती . अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या श्रीमती अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. आज लक्ष्मण जगताप यांची मासिक पुण्यतिथी दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्विनी जगताप यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

श्रीमती अश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले कि “आज लक्ष्मणभाऊंची मासिक पुण्यतिथी. त्यांच्या पश्चात अश्विनीवहिनी जगताप यांनी भाऊंचा चिंचवडच्या विकासाचा संकल्प घेऊन काम सुरू केले आहे. चिंचवडकरांनी अश्विनीवहिनींना विजयी करुन एकप्रकारे लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजलीच वाहिली. आज वहिनींचे अभिनंदन केले आणि भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजप आणि शिवसेनेचे ( शिंदे ) प्रमुख नेत्यांनी चिंचवडच्या प्रचारात मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील चिंचवड निवडणुकीकडे प्रचार यंत्रणेवर विशेष लक्ष ठेऊन होते.

या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी विजय मिळवला. जगताप यांचा ३६, ०९१ मतांनी मोठा विजय झाला . त्यांना ३७ व्या फेरीनंतर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मत मिळली. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मत मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मत मिळाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.