अश्विन कुमारच्या घरी पोलिसांची धाड, तब्बल 25 किलो चांदी अन् 2 किलो सोने जप्त

पुणे: पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे.

पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.

पुणे पोलिसांच्या वतीनं तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. सुपेचे आणखी 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. 24 तासात सुपेचे 63 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. तुकाराम सुपेकडून आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता आहे.