राज्यपाल संविधानाप्रमाणे वागत नसतील तर सरकारने दोन हात करण्याची हिंमत दाखवावी – भास्कर जाधव

मुंबई: शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र तुमचे सद्सय असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल भास्कर जाधव यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सभागृहातील एक सदस्य सातत्याने टीका टिप्पणी करत असल्याचं मी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याबाबाबत आवाज उठवला होता. त्यांना समज देऊन देखील ते वारंवार टीका करत आहेत हे मी निदर्शनास आणून दिलं. तालिका अध्यक्ष म्हणून मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यामुळे माझ्यावर टीका सुरू होती, असं भास्कर जाधव म्हणाले.

अध्यक्षांचा आदेश मानून आम्ही सभागृहातून बाहेर गेलो. 5 जुलैला मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी माझ्याबद्दल अवमानकारक विधान केलं होतं. नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन 12 आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलले असते, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल त्यांनी केला.