मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना तात्काळ निलंबित करा; देवेंद्र फडणवीस आक्रमक

21

मुंबई: आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. तसंच भाजपचे सगळे आमदारही आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांच्यासह सगळ्याच आमदारांनी केली.

भास्कर जाधव यांनी दोनवेळा उठून उभं राहात मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही त्यामुळे मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं सांगितलं. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. ज्यामुळे विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहण्यास मिळाला. देशाच्या सर्वोच्च नेत्याची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर भास्कर जाधव माफी मागा या घोषणाही सभागृहात मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या.

यानंतर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. आज भास्कर जाधव बोलायला उभे राहिले त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांबाबत त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं. ज्यानंतर चांगलाच गदारोळ सभागृहात झालेला बघायला मिळाला. उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहात असलेले भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी एकमुखी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.

माफी मागा माफी मागा अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्यांची माफी मागितलीच पाहिजे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य आणि अंगविक्षेप कधीही सहन केला जाणार नाही. यानंतर भास्कर जाधव पुन्हा सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले काला धन लाना हैं की नहीं लाना हैं? अशी ती नक्कल होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल भास्कर जाधव यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांना लाज वाटली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.