मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे.

500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.

मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!