मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार? महापौर पेडणेकर काय म्हणाल्या, जाणून घ्या..
मुंबई: मुंबईत कोरोनाच्या वाढत्या आकड्याने धडकी भरवली आहे. मुंबईत कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारापर्यंत गेली तर लॉकडाऊनचा विचार करावा लागले, असं मुंबईच्या महापौरा किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. गुरुवारी मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर बोलताना आज महापौरांनी मिनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. विंकएन्ड लॉकडाऊन सर्वांना पवडण्यासारखे असल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना परिस्थितीवर चर्चा करत आहेत. देशपातळीवर चर्चा करत आहेत. महानगरपालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. लोक घाबरले आहेत संपूर्ण लॉकडाऊन होईल का, आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. परंतु बेफिकीरपणे काही नागरिक वागत राहिले तर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल. १०० मधील १० टक्के लोकं नियम पाळत नाही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगितल्याप्रमाणे केले तर या लाटेला थोपवू शकतो असं महापौर म्हणाल्या आहेत.
मुंबईतील आणि राज्यात रुग्णालयातील डॉक्टर बाधित होत आहेत. बेस्टचे कर्मचारी बाधित होत आहे. रुग्णालयातील बेड रिकामे असल्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंधांवर चर्चा होईल. शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे मुंबईत येणारे-जाणाऱ्यांची संख्या वाढते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. परंतु मुख्यमंत्री यावर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय घेतील. धोक्याची पातळी वेळीच रोखावी अशा पद्धतीने मुख्यमंत्री निर्णय घेतील. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.