मुंबईतील ताडदेव परिसरातील 20 मजली इमारतीला भीषण आग; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15 जखमी

74

मुंबई: मुंबईतल्या ताडदेव परिसरात इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 20 मजली इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही भीषण आग लागली. नाना चौक परिसरातील भाटिया रुग्णालयाजवळील कमला नावाच्या इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी 7च्या सुमारास इमारतीला आग लागली. या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

ताडदेव परिसरातील कमला इमारतीला सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली. ही लेव्हल 3 ची आग असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी घटनास्थळावर पाच रुग्णवाहिका दाखल आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

या आगीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना नजीकच्या नायर आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला. तर आगीमध्ये 15 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे तर इतरांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागलेल्या 18 व्या मजल्यावर आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.