टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 6 गडी राखून दणदणीत विजय

नागपूर: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी20 सामना काल नागपूर येथे झाला आहे. यामध्ये टीम इंडियाने 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकाही 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना आता 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्याला ओल्या मैदानामुळे 2 तास विलंब झाला. हा सामना 8-8 षटकांचा होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या होत्या.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मोहातील सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर आता हैदराबादच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ T20 सीरीजचा विजेता ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलने 2 बळी घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!