श्री वाघजाई महाकाली चषक २०२३ क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

1

ठाणे : कांदाटी अससोसिएशन च्या मान्यतेने आपल्या उत्कर्ष युवा मित्र मंडळ पु.मोरणीच्या वतीने रविवार दि.०५फेब्रुवारी रोजी शास्त्री नगर ठाणे येथे प्रथमच श्री वाघजाई महाकाली चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक स्थानिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि क्रिकेट रसिकांनी देखील स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे बंधु समाजसेवक सुभाष शिंदे, युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, महाड तालुका सहसंपर्कप्रमुख प्रमोद गोगावले, युवासेना शाखाप्रमुख .विजय मालुसरे,समाजसेवक विनोद पाटील,गोल्डमॅन हरीश पाटील, समाजसेवक भूषण मोरे,समाजसेवक पुरुषोत्तम ठाकूर,कांदाटी अससोसिएशन अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार व सर्व पदाधिकार उपस्थित होते. त्यासोबतच सोळा गावातील सर्व जेष्ठ श्रेष्ट मंडळी सर्वांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्व जेष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे

१)प्रथम विजेता – शिंदी संघ
२)द्वितीय विजेता – वलवण संघ
३)तृतीय क्रमांक – चकदेव संघ

मालिकाविर म्हणून शुभम मोरे, उत्कृष्ट फलंदाज विकास जाधव ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अविष्कार जंगम,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विकास मोरे यांचा गौरवकरण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष युवा मित्र मंडळ पु.मोरणी च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली व क्रिष्णा शिंदे यांच्या स्थानिक मंडळ शिवराज मित्र मंडळ व तिरंगा मित्र मंडळ ठाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.