विराट कोहलीच्या मोठ्या वक्तव्यावर सौरव गांगुली, म्हणाले…

27

मुंबई: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी विराट कोहली याने पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये  मोठा भूकंप आला आहे. विराट कोहली याने पत्रकारांसमोर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही खोटं ठरवलं आहे. सौरव गांगुली यांनी टी-20 कर्णधारपद न सोडण्यास आपल्याला कधीही सांगितलं नव्हतं, असा खुलासा विराटनं केला होता. त्यावर आता सौरव गांगुली यांनी मात्र संयमी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

विराटच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सौरव गांगुली यांनी ‘नो कमेंट्स’ अशा दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करेल, असे देखील सौरव गांगुली यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, आम्ही विराटला T20 कर्णधारपद सोडू नये, अशी विनंती केली होती, पण त्याला या पदावर राहायचे नव्हते, असं वक्तव्य सौरव गांगुली यांनी केलं होतं.

ते म्हणाले होते, की पांढऱ्या चेंडूच्या दोन फॉरमॅटमध्ये दोन कर्णधार असू शकत नाहीत, असे निवडकर्त्यांचा निर्णय होता. नंतर रोहित शर्मा याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट संघाचे तर विराट याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृ्त्त्व करावे, असा निष्कर्ष काढण्यात आला होता, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली होती. मात्र, विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत सौरव गांगुलीनी आपल्याला टी-20 कर्णधारपद सोडू नकोस, असे कधीही म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावर सौवर गांगुली काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. परंतु, नो कमेंट्स म्हणून सौरव गांगुली यांनी या विराट कोहलीच्या स्पष्टीकरणावर उत्तर देणं टाळलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.