सीताफळ खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत; जाणून घ्या!
मुंबई: आपल्याला बाजारामध्ये सध्या सगळीकडेच सीताफळ दिसत आहे. कारण आता सध्या सीताफळाचे सिजन सुरु झाले आहे. आपण सुद्धा सिजन नुसारच फळे खात असतोय, त्यात नवरात्र काही दिवसातच सुरु होणार आहे. त्यामुळे उपवासाठी सुद्धा या फळाची मागणी वाढत असते. पण, जी फळे आपण खातो त्याचे आपल्या आरोग्याला किती चांगले फायदे आहेत. हे कधी आपण जाणून घेतो का? कारण ज्या गोष्टी आपण सेवन करतो त्याचा आपल्या शरीराला फायदा आणि तोटा काय होतो हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे असते.
नवरात्र पासून आपल्याला बाजारात सीताफळ दिसायला लागतात. या सीताफळाचा सिजन अवघे तीन ते चार महिने इतका असतो. त्यामुळे त्या सिजनमध्ये त्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सीताफळाचे आरोग्याला कोणते फायदे आणि तोटे होतात.
हृदय निरोगी राहते
सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, राइबोफ्लेविन, थायमिन, नियासीन इत्यादी मुबलक प्रमाणात असते. याशिवाय सीताफळमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस यांचा देखील समावेश असतो. तसेच इतर फळांच्या तुलनेत सीताफळमध्ये अधिक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. विशेष म्हणजे सीताफळमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
सीताफळमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आवश्यक राइबोफ्लेविन घटक असतात, जे डोळ्यांची शक्ती संतुलित ठेवतात. डोळे निरोगी ठेण्याबरोबरच डोळ्यांशी संबंधित विविध रोगांशी लढायला संरक्षण देण्याचे काम सीताफळ करते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
सीताफळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात. जे आपल्या शरीरात अनेक आजारांविरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करतात आणि शरीर निरोगी राहते.
त्वचेसाठी लाभदायक
सीताफळमध्ये असेले गुणधर्म चेहऱ्याला चमक आणतात. त्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडेंट्सची चांगली मात्रा यामुळे त्वचेला मुक्त रॅडिकल थांबवून त्वचेला वृद्धी होण्यापासून प्रतिबंध करते. तसेच त्वचेतील चमक आआणि मुलायमपणा टिकवून ठेवते. तसेच त्वचा टाइट होते आणि चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाहीत.