‘युवा’ तरुणांची सामाजिक बांधिलकी, प्रशासनाला केली ही मदत

108

संपूर्ण देश, महाराष्ट्र आणि आपलं पुणे संकटात असताना मैत्री सोबतच सामाजिक भान जपणारा मित्रमंडळींचा पुण्यातील एक कुटुंबांप्रमाणे राहणारा ग्रुप म्हणजे ‘युवा’ ग्रुप. वॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून हे मित्र आणि आता त्यांचे परिवार एकमेकांशी गेली अनेकवर्षांपासून जोडलेले आहेत.

पालखी सोहळा असो, वा आपापल्या परिसरातील सामाजिक उपक्रम ग्रुप चे सदस्य सर्वच एकदम मन लावून सह्भागी होणार, आणि त्या उपक्रमाला यशस्वी करणार. युवा ग्रुप कॉलेज आणि कॉलेजेरत मित्रमंडळीचा, हे मित्रमंडळी आता आपापल्या व्यवसायात आणि संसारात व्यस्त आहेत पण नेहमी लहान मोठ गेट टूगेदर असो, वन डे पिकनिक असो वा मोठी टूर सहभागी होण्यासाठी सर्वच उत्सुक, का नसणार ? आता तो एक ग्रुप नसून परिवार झाला आहे त्या सर्व जोडल्या गेलेल्या कुटुंबांचा.

पुण्याच्या महानगरपालिकेच्या फेसबुक पेज वर मदतीचे एक आवाहन पाहून, ग्रुप मध्येचर्चा चालू झाली आपण काय करू शकतो. प्रत्येक जन वेगळ्या क्षेत्रातील, सर्वांचे सल्ले आणि गरजू गोष्टीची उपलब्धता पाहून ठरल महानगरपालिकेला पी.पी.इ. किट दयायला हवेत. सर्वांना स्वइच्छेने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आणि २४ तासामध्ये एक चांगली आर्थिक मदत जमा झाली. पी.पी.इ. किट वितरकाला संपर्क करण्यात आला. छोटी ऑर्डर असताना मुंबई किंवा इतर राज्यातील वितरक पाठविण्यास तयार नव्हता आणि त्याच्या वाहतुकीचा खर्च देखील अवास्तव होता. गुजरात मधील एका व्यावसायिकाचा फोन आला आणि त्याने पुण्यातील एका वितरकासाठी काही किट मोठ्या संख्येत पाठवणार असल्याचे सांगितले आणि त्यासोबतच हे युवा ग्रुपचे पन्नास पी.पी.इ. किट तो पाठविण्यास तयार झाला. सदर पी.पी.इ. किट पुण्यातील वितरकाकडून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घेण्यात आले आणि युवा ग्रुपच्या वॉटसअप ग्रुप वर आनंद व्यक्त करण्यात आला.

पी.पी.इ. किट मिळताच पुणे महानगरपालिकेतील अधिकारी यांना संपर्क करण्यात आला आणि त्यांनी सदर किट घेऊन महानगरपालिका भवन येथे आयुक्त कार्यालय इथे दुसऱ्या दिवशी बोलावले आणि ग्रुप मधील शिवाजीनगर भागात राहणारा एक सक्रीय सदस्य ते पन्नास पी.पी.इ. किट घेऊन कार्यालयात दाखल झाला आणि त्याने ते सर्व संबंधित अधिकारी यांना दिले. महानगरपालिका पालिकेकडून मदत केल्यामुळे एक प्रशंसापत्र सुद्धा देण्यात आले. जे युवा ग्रुपच्या नावाने आहे.

Letter of Appreciation to Yuva Group, From PMC Commissioner

आज सर्व सदस्य आनंदी आहेत, या कोरोनाच्या लढ्यात सहभागी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर आहे आणि युवा ग्रुपचा सदस्य असल्याचा अभिमान आहे.

युवा ग्रुपने टाकलेलं हे छोटस पाऊल, शहरातील अनेक युवा तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरणार आहे यात शंका नाही. युवा तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीला फर्स्ट महाराष्ट्राचा सलाम..

( वैयक्तिक कोणालाही प्रसिद्धीची कसलीही अपेक्षा नाही म्हणूनच या बातमीमध्ये आणि आयुक्तांच्या लेटर मध्येही कोणाएकाचेही नाव नाही )

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!