रामायणातील तत्वज्ञानाची सबंध जगाला आवश्यकता आहे – चंद्रकांत पाटील

मुंबई : मुंबई येथील के. जे. सोमय्या विद्यापीठातील नालंदा सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी रामायणाबाबत आजही भारतीय जनमानसात असणारी आस्था आणि त्यातील तत्त्वज्ञानाची जगाला असणारी गरज याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आपले विचार मांडले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले कि ,  या ग्रंथात  जीवन कसे जगायचे याची माहिती मिळते. पत्नी सोबत कसा व्यवहार करायचा, मुलांसोबत कसा व्यवहार करायचा, आईसोबत कसा व्यवहार करायचा, शत्रूसोबत कसा व्यवहार करायचा.  यामुळे ५००० वर्षांननंतर देखील त्यातील गोडवा कायम आहे. आजही रामायण टीव्ही वर लावले जाते, महाभारत बघण्याची उत्सुकता असते. शिवाजी महाराजांच्या जीवनावर मालिका येत आहे मला पाहायची आहे अशी एक उत्सुकता असते. त्यामुळे ज्यामध्ये आस्था आहे असा विषय तुम्ही निवडला आहे, त्यामुळे मी तुमचं अभिनदंन करतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. याची गरज देशालाच नाही तर जगाला आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

सोमय्या विद्यापीठाचे कुलपती समीर सोमय्या तसंच सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई, अयोध्या रिसर्च इन्स्टिट्यूट विभागाच्या डायरेक्टर डॉ. सुप्रिया राय, डॉ. लवकुश द्विवेदी, प्राध्यापक आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ही परिषद दोन दिवसांची आहे. या परिषदेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं विद्यापीठ परिसराची पाहाणीही करण्याचा योग आला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!