चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ समाजसुधारक, मराठा महासंघाचे अध्वर्यू कै. शशिकांत पवार यांच्या कुटुंबीयांची घेतली सांन्त्वनपर भेट

मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने धडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची मंगळवारी भेट घेत त्यांचे सांन्त्वन केले.

चंद्रकांत पाटील याची म्हटले कि, ज्येष्ठ समाजसुधारक, मराठा महासंघाचे अध्वर्यू, अनेकांना घडवणारे कै. शशिकांत पवार ऊर्फ अप्पासाहेबांच्या निधनाने अतिशय दुःख झालं. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्त्वन करण्यासाठी दादरच्या घरी भेट दिली. अप्पासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

शशिकांत पवार यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे अशीही त्यांची ख्याती होती. मराठा आरक्षणाच्या विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मताचे ते होते. यासाठी त्यांनी या वयातही अंदोलन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!