कसब्यात भाजपकडून प्रचाराचा धडाका, महायुतीच्या नेत्यांच्या एकत्र सभा

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कसब्यात आज दिवसभर राजकीय नेत्यांचा वावर असणार आहे.  भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आघाडीकडून रोड शो आणि बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज कसब्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.

महायुतीमधील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, पतित पावन संघटना, शिवसंग्राम, आठवले गट हेमंत रासने यांच्यासाठी सभा घेणार आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसब्यात सभा घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.  अलिकडेच शिंदेंना निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्याने शिंदे प्रचारसभेत काय बोलणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दुसऱ्या बाजूला रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून बाईक रॅली आणि रोड शो चं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. आज सांयकाळी पाच वाजता याला सुरूवात होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी येत्या 26 फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसा तसा प्रचाराचा जोरही वाढवला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!