कोल्हापूर मधील न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवीवर्षाचा सांगता समारंभ संपन्न, चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

24

कोल्हापूर : न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवीवर्षाचा सांगता समारंभ व संस्थेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या  शतसंवत्सरी या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनल शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत याची माहिती दिली. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. या संस्कारातूनच त्यांची चांगली जडण-घडण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच छोटे-छोटे संकल्प करावेत. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट ९० दिवस केल्यास त्याची शैली बनते, यासाठी लहाणपणीच छोटे-छोटे संकल्प करुन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. शिक्षण, व्यायाम व योगाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, असा मौलिक सल्ला अमितभाईंनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यानी शालेय जीवनातच आपले लक्ष निर्धारित करून हे लक्ष साध्य करून संकल्प करावेत , संकल्पाला यशाची जोड देऊन यशाला गवसणी घाला. असा संदेश अमित शाह यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री दीपकजी केसरकर , खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.