पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर : कोल्हापूरमधील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. चा २८ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बँकेच्या मुख्यालयास सदिच्छा भेट दिली आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, सत्यजीत कदम, बॅंकेचे बोर्ड ॲाफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष शंकर पाटील, बोर्ड ॲाफ डायरेक्टरचे अध्यक्ष विनोद मेहता, उपाध्यक्ष विनोद शाह, मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील, शाखाधिकारी विनय शिंदे आणि संचालिका पूनम शाह यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बँकेच्या गेल्या २८ वर्षांतील प्रगतीचे आणि ग्राहकसेवेचे कौतुक केले. सहकार चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्यात पार्श्वनाथ बँकेने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.