चंद्रकांत पाटील यांनी साधला कसब्यातील मुस्लिम भगिनींशी संवाद… भाजपाला आपले आशीर्वाद देऊन विजयी करण्याचं केले आवाहन
पुणे : कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूक आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीने आणि भाजपने प्रचारासाठी नेत्यांची फौजच उतरवली आहे. भाजपचे तर अनेक दिग्गज नेते प्रचार करत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर भाजपला विजयी करण्याचा जणू निर्धारच केला आहे. तेही दिवसरात्र प्रचार, सभा, संवाद यात्रेत सहभाग घेत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ खडक पोलीस वसाहत भागातील मतदारांशी विशेषतः मुस्लिम भगिनींशी संवाद साधला. या वेळी केंद्र सरकार मुस्लिम समाजाच्या विकासासाठी राबवत असलेल्या विविध योजनांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली.
ट्रिपल तलाक रद्द करुन, मुस्लिम माता-भगिनींच्या हक्कांचं रक्षण मोदीजींनी केलं असल्यामुळे भाजपाला आपले आशीर्वाद देऊन विजयी करण्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आवाहन केलं.चंद्रकांत पाटील यांच्या या आवाहनाला मुस्लिम भगिनींनीं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भाजपालाच विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी यावेळी व्यक्त केला.
#कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार @HemantNRasane यांच्या प्राचारासाठी खडक पोलीस वसाहत भागातील मतदारांशी संवाद साधला आणि मतरूपी आशीर्वादाने विजयी करण्याचं आवाहन केलं. भाजपालाच विजयी करण्याचा निर्धार या वेळी सर्वांनी व्यक्त केला. #कसब्यातकमळच #कसब्याचीपसंतरासनेहेमंत pic.twitter.com/xCi7baupvz
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 22, 2023