जेव्हा रिक्षाचालकांनी आंदोलन केलं, तेव्हा त्यांच्याशी बोलणी करून त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे आम्ही लक्ष दिलं – चंद्रकांत पाटील

पुणे : ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने कसबा पोटनिवडणुकीतील भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिलाय. तसं पत्र संघटना प्रमुख डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलंय. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. आमचं सरकार रिक्षाचालकांच्या पाठिशी सदैव उभं राहील, असं चंद्रकांत पाटील यांनी आश्वस्त केलं. रिक्षावाल्यांचा स्नेह मेळावा आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, आंदोलनाकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. जेव्हा रिक्षाचालकांनी आंदोलन केलं, तेव्हा त्यांच्याशी बोलणी करून त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे आम्ही लक्ष दिलं. चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाबाबत एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले कि, अंदोलकांना आम्ही सांगितले कि आई रडल्याशिवाय काय दूध देत नाही. त्यामुळे तुम्ही जोरात रडा असा त्यांना सल्ला दिला. तर ते म्हणाले कि आम्ही रडत राहिलो आणि दुधचं नाही दिल तर , रडून रडून आमचा घसा कोरडा होईल. पाटील मिश्कीलपणे म्हणाले कि तुमचा घसा कोरडा व्हायच्या आधी तुम्हाला दूध मिळेल.
रिक्षावाल्यानी एक व्यवहारिक मुद्दा पुढे उपस्थित केला कि आम्ही दोन तीन दिवस रिक्षा लावून जर अंदोलन करत राहिलो तर आमच्या जेवणा – खाण्याचं काय? तर यावर पाटील यांनी उत्तर दिल कि परमेश्वर आहे. त्याप्रमाणे हे आंदोल चाललं , कोर्टात गेलं. प्रशासनालाही त्याचे महत्व कळलं. मधल्या काळात आमचं सरकार आलं. देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री एकनाथजी हे संवेदशील लोक आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांनी रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले, असे पाटील यांनी म्हटले.