स्वराज्याचे शिलेदार यांची सिंहगडावर साफसफाई, ३७४० प्लास्टिक व ४२ दारूच्या बाटल्यांचे संकलन
सकाळी लवकर जाऊन प्रतिष्ठान च्या युवकांनी कर्वेनगर मधील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना स्वच्छ पुसून हार घालून मानवंदना देऊन शिवकार्य स्वच्छते साठी साठी लागणारे साहित्य घेवून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान चे शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देवून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
सिंहगड किल्ल्यावरील खंद कडा ,कल्याण दरवाजा ,झुंजार बुरुज , स्मारकाच्या भोवताल चा परिसर , कल्याण दरवाजा ते चोर वाट या खालच्या भागातील सर्व प्लास्टीक बाटल्या गोळा करण्यात आल्या. सर्व प्लॅस्टिक व दारूच्या बाटल्या एकत्र करून 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे पावन झालेल्या स्मारक समोर ठेवण्यात आल्या.
सुभेदार….माफी असावी क्षमा असावी..हाच इतिहास(कचऱ्याच्या)आम्ही पुढील पिढीला प्रेरणा देणारा म्हणून सांगणार आहोत का.. कधी कळणार आम्हास,आम्ही चुकतोय तरी आम्ही कचरा करतोय…..ना वाजवतो ना गाजवतो ना नाचवतो आम्ही महाराजांचा इतिहास आम्ही जपणार भावी पिढीसाठी ..संवर्धन हीच आमची जात आणि हाच आमचा धर्म
शिवकार्य ची सांगता ही नुकतेच राज्य गीत गर्जा महाराष्ट्र व शिवघोष करून करण्यात आली. त्यांनतर भोजन करून पुढच्या राहिलेल्या गड स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. प्रतिष्ठान चे शिलेदार मंगेश नवघणे म्हणाले सिंहगड हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्यागाचा, प्रेरणादायी विचारांचा आहे.किल्यावर वाढलेले पर्यटन व व्यवसाय मुळे किल्ल्याची कचरा कुंडी झाली आहे.ती दिवसेंदिवस वाढतच आहे,
सिंहगड किल्ल्यावर वन विभागाने प्लॅस्टिक बंदी ही गडाचे सौदर्य खुलविण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केली पण तशी बंदी 2008 पासून च आहे पण ती मात्र तिथल्या फलकावर च आहे.पुन्हा गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्लास्टीक बंदी व दारू बंदी अगोदर असल्याने तरी सुद्धा दोन्ही कचरा सिंहगड किल्ल्यावर फार मोठ्या प्रमाणात सापडतो. त्यावर 100 ते 500 दंड असून सुध्धा त्याची अंमलबजावणी होत नाही ही मोठी शोंकतिका आहे. गडावर 150 पेक्षा पाण्याच्या टाक्या आहेत. त्याची निगा राखून त्यात नळ द्वारे पाण्याची सोय होऊ शकते. किंवा देवगिरी व वासोटा किल्ल्याच्या धर्तीवर सिंहगड किल्ल्यावर योजना राबविण्यात यावी. काही हॉटेल व्यावसायिक बाटल्या व इतर कचरा वर घेवून येतात मात्र तेच खाली घेवून जात नाही तोच कचरा आज ही टाक्यात व बुरूजाखाली टाकला जातो..तसेच टोल घेतला जातो मात्र तिथे तपासणी न करता दारू च्या बाटल्या गडावर आढळतात . पर्यटक सोबतच वन खाते व हॉटेल व्यवसायिक दोषी आहेत… सर्वांशी त्वरित पत्र व्यवहार करून कडकं प्लॅस्टिक बंदी करण्यात यावी नाहीतर प्रतिष्ठान तर्फे फलक बाजी व आंदोलन करण्यात येईल.
या मोहिमेत आरव शिंदे, सुशांत साळवी,स्वहित कळंबटे, स्वराज कळंबटे, सूरज कांबळे,भारत रेणुसे, सुयश सावंत,अनिल कडू, रमेश ढोकळे,निलेश भगत, अक्षय तेटंबे,अभिजीत शिंदे , मंगेश नवघणे, सागर फाटक ,परशुराम धूर्वी,केतन महामुनी,संतोष वरक सहभागी झाले होते.
या मोहिमेचे नियोजन स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, पुणे विभाग रमेश ढोकळे यांनी केले होते.